कन्नड(औरंगाबाद)- लॉकडाऊन सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद पथकाने देशी दारूची अवैधपणे वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत चारचाकी वाहनासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. भरारी पथकाने 1 लाख 37 हजार 440 रुपये किमतीच्या देशी दारूचे 13 बॉक्स ताब्यात घेतले.
कन्नड तालुक्यातील कालीमठ येथील आंबा रोडवरील आंबा गावाच्या शिवारात मारुती सुझुकी ओम्नी या गाडीला राज्य उत्पादन शुल्कच्या औरंगाबादच्या विभागीय पथकाने पाठलाग पकडले. यावेळी त्या गाडीत देशी दारूचे 180 मि.ली. चे 13 बॉक्स( 624 बॉटल) आढळून आले. भरारी पथकाने ते सर्व बॉक्स जप्त केले असून त्याची 1 लाख 37 हजार 440 रुपये इतकी होत असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.