महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज दहावीची परीक्षा; कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज - यंत्रणा

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा मंडळाने तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेला सुरुवात

By

Published : Mar 1, 2019, 12:30 PM IST

औरंगाबाद- दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. सकाळी ११ ते २ या काळात सर्व पेपर होणार असून आज मराठीच्या पेपरने परीक्षेला सुरुवात होत आहे. औरंगाबाद विभागात येणाऱ्या ५ जिल्ह्यात १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.


राज्यभरात आज दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा मंडळाने तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी ३२ पथक गैरप्रकारावर लक्ष ठेवणार आहेत. प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थी बसवले जावेत अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.


अशी आहे परीक्षा विभागाची स्थिती


औरंगाबाद - २२० केंद्र, ६५, ४७७ विद्यार्थी


बीड - १५२ केंद्र, ४३,७०१ विद्यार्थी


जालना - ८७ केंद्र, २८,८२४ विद्यार्थी


परभणी - ९४ केंद्र, ३१,४०६ विद्यार्थी


हिंगोली - ५३ केंद्र, १६,६५३ विद्यार्थी

ABOUT THE AUTHOR

...view details