महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने विशेष मुलांच्या लसीकरणाला सुरुवात - विशेष मुलांचे लसीकरणाला सुरूवात

गतिमंद मुलं-मुली आणि त्यांचे पालक यांच्यासाठी विशेष कॅम्प सुरू करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार सोमवार 31 मे पासून विशेष मुलांच्या विशेष लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील लहुजी साळवे आरोग्य केंद्रात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

लसीकरण मोहिम
लसीकरण मोहिम

By

Published : May 31, 2021, 4:09 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याने राज्यात आता लसीकरण मोहीम वेगाने सुरू करण्यात आली आहे. त्यातच समाजापासून वंचित असणाऱ्या घटकांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिकेने केले असून त्यातच आता गतिमंद मुला-मुलींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी 90 जणांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

महानगरपालिकेच्या वतीने विशेष मुलांचे लसीकरणाला सुरूवात
एका आठवड्यात पूर्ण करणार विशेष मुलांचे लसीकरण

औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत विशेष म्हणजेच गतिमंद मुल-मुलींना संरक्षण देणे गरजेचे झाले होते. त्यामुळे त्याबाबत नियोजन करण्यात आले. गतिमंद मुल-मुली आणि त्यांचे पालक यांच्यासाठी विशेष कॅम्प सुरू करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार सोमवार 31 मे पासून विशेष मुलांच्या विशेष लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील लहुजी साळवे आरोग्य केंद्रात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आमदार संजय शिरसाठ, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, मनपा आरोग्य कर्मचारी डॉ नीता पाडळकर यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली.

विविध संस्थांकडून मागवली माहिती

विशेष मुलांचे लसीकरण करण्यासाठी विविध संस्थांमध्ये असलेल्या मुलांची माहिती मागवण्यात आली. त्या नुसार लसीकरण मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले. पुढील एक आठवड्यात विशेष लसीकरण मोहीम पूर्ण केली जाणार आहे. कोरोनाला हरवण्यासाठी एक एक पाऊल टाकत असल्याचं पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

हेही वाचा -सासूच्या भांडणाचा राग बाळावर, नागपुरात निर्दयी मातेकडून चिमुकल्याला मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details