महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनचा 7 विशेष पथकांद्वारे घेतला आढावा

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलिसांच्या सात विशेष पथकांद्वारे जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनचा पोलीस ठाणे निहाय आढावा घेतला. पोलिसांच्या पथकांनी नागरिकांना या परिस्थिीतीत घाबरुन न जाता, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यायची खबरदारीबाबत अत्यावश्यक सूचना व माहिती दिली. सात विशेष पथकांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.

By

Published : Jun 18, 2020, 5:10 PM IST

police taking review of containment zone
कंटेनमेंट झोनचा आढावा घेताना पोलीस

कंटेनमेंट झोनचा आढावा घेतना पोलिसांचे पथक

कन्नड(औरंगाबाद)-कोरोना विषाणूच्या ग्रामीण भागात होणाऱ्या प्रादुर्भावाचा आढावा घेणे. सध्या जिल्ह्यात असलेल्या कंटेनमेंट झोन भागात लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त तपासणे. कंटनेमेंट झोनमधील नागरिकांना सूचना देण्यासाठी औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलिसांच्या सात विशेष पथकांद्वारे जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनचा पोलीस ठाणे निहाय आढावा घेतला. पोलिसांच्या पथकांनी नागरिकांना या परिस्थिीतीत घाबरुन न जाता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घ्यायची खबरदारी आणि इतर अत्यावश्यक सूचना व माहिती दिली. सात विशेष पथकांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.

जिल्हातील अब्दालशा नगर, सिल्लोड. सावरखेडा, सोयगाव. फत्तेमैदान- फुलंबी, बाबरा- वडोदबाजार, राजवाडा पांढरी मोहल्ला कन्नड, देवळाना देवगाव रंगारी, धनगर वस्ती औराळा- देवगाव रंगारी, राजीव गांधीनगर- खुलताबाद, सुंदर गणपती परिसर- वैजापुर , फुलेवाडी-वैजापुर, दुर्गावाडी- वैजापुर , पिंपळगाव दिवशी -शिल्लेगाव , फुलशिवरा-शिल्लेगाव, यशवंतनगर - पैठण या कंटेनमेंट झोनमध्ये पोलीस निरीक्षक भागवत फुदे, मुकुंद आघाव,बालक कोळी, अशोक मुदीराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, गोरख शेळके, पोलीस उपनिरीक्षक अशोक जावळे यांनी भेटी दिल्या. त्यांनी या सर्व ठिकाणचा (गावांचा) आढावा घेतला.

पोलिसांच्या विशेष पथकाने या सर्व भागात राहणाऱ्या लोकांना आधार व दिलासा देत त्यांच्या बाजूला व परिसरात कोरोनाबाधित रुग्ण मिळाला म्हणून घाबरून जावू नका,असे आवाहन केले. प्रशासन,आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन हे तुमच्या सोबत आहेत, या परिस्थितीत नागरिकांनी वैयक्तिक खबदारी घेण्याबाबत अधिक जागृत राहून कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो. साहित्य खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, घरातील एकाच व्यक्तीने साहित्य खरेदीसाठी जावे, मास्क व हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, याबाबींना आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक करून घ्यावा, असे पोलिसांच्या पथकाने सांगितले.

कोरोना (कोविड-१९) विषाणू संसर्गाला घाबरु नका, वैयक्तिक खबरदारी घ्या, दक्ष रहा, घरीच रहा, सुरक्षित रहा, आपल्या सतर्कतेमुळे आपण कोरोनाचा शिरकाव निश्चित रोखू शकतो, असा आत्मविश्वास पोलिसांनी नागरिकांमध्ये निर्माण केला. त्याचप्रमाणे बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी यांना सुध्दा यावेळी मास्क, सॅनिटाईझर, फेसगार्ड, यांचा नियमित वापर करणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हातील सर्व नागरिकांनी स्वतः तसेच आपले कुटूंब, गाव, वाडी, वस्ती, तांडा, व जिल्हा येथे कोरोना (कोविड-१९) विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्थानिक पातळीवर "कोरोनादूत" म्हणून वैयक्तिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details