गंगापूर (औरंगाबाद) -गंगापूर तालुक्यातील झोडेगाव येथील सैन्याच्या वायु दलामध्ये कार्यरत असलेल्या सचिन परदेशी या जवानाचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर झोडेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
औरंगाबाद : गंगापूरच्या झोडेगावचे पुत्र जवान सचिन परदेशी यांचे निधन - औरंगाबाद गंगापूर जवान सचिन परदेशी मृत्यू
झोडेगावचे पुत्र असलेले सचिन नरेंद्रसिंह परदेशी 2002 साली सैन्यदलाच्या एआरटी रेजिमेंट, नाशिक येथे भरती झाले होते. काही वर्षांपूर्वी सचिन परदेशी यांचा हेलिकॉप्टरमधून उडी मारत असताना अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार घेऊन ते पुन्हा कामावर रूजू झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू होते.
![औरंगाबाद : गंगापूरच्या झोडेगावचे पुत्र जवान सचिन परदेशी यांचे निधन Aurangabad Zodegaon jawan Sachin Pardeshi dies](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10810750-436-10810750-1614498308789.jpg)
झोडेगावचे पुत्र असलेले सचिन नरेंद्रसिंह परदेशी 2002 साली सैन्यदलाच्या एआरटी रेजिमेंट, नाशिक येथे भरती झाले होते. विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर त्यांची बदली जम्मू-काश्मीर येथील लडाख येथे झाली होती. देशाच्या सेवेवर असताना काही वर्षांपूर्वी सचिन परदेशी यांचा हेलिकॉप्टरमधून उडी मारत असताना अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार घेऊन ते पुन्हा कामावर रूजू झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 26) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जवान सचिन यांच्या जाण्याने झोडेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर झोडेगाव येथे सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.