औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी किलेअर्क येथील 60 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला असून हा कोरोनाचा सहावा बळी ठरला आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाचा सहावा बळी, किलेअर्क येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू - corona update aurangabad
औरंगाबादमध्ये कोरोनामुळे आणखी एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून बळींची संख्या ६ वर गेली आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडा 53 वर पोहोचला आहे.
कोरोनाग्रस्त 60 वर्षीय महिलेला लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे 25 एप्रिलला घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यांची स्वॅब चाचणी घेण्यात आली व त्याच दिवशी त्यांचा कोव्हीड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटीतील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आत्तापर्यंत औरंगाबादेत कोरोनाचे 53 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू याआधी झाला असून किलेअर्क येथे राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने आता मृत्यूचा आकडा सहावर गेला आहे.
या महिलेच्या मृत्यूचे कारण बायलॅटरल न्युमोनाटीस विथ अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम ड्यू टू कोव्हीड -19 इन केस ऑफ डायबेटिस मलायटस टाइप टू विथ डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेंशन, इस्चेमिक हार्ट डिसिज विथ हायपोथयरॉडिझम असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत चालल्याचे दिसून येत असून कोरोनाला थांबवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.