महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Six People Suicide In Aurangabad : भयंकर! औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी सहा आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यात भयंकर घटना समोर आली आहे. एकाच दिवशी एक नाही दोन नाही तर तब्बल सहा जणांनी आत्महत्या केल्या आहेत. (Six People In Aurangabad District) या घटनेने औरंगाबाद शहरासह जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त होत आहे. अशा प्रकारे घडणारी ही घटना पहिलीच आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Mar 2, 2022, 9:10 AM IST

औरंगाबाद - मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या २८ वर्षीय तरुणासह आणखी पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आली आहे. मंगळवार (दि. १)रोजी वेगवेगळ्या घटनेत सहा आत्महत्या उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार हा आत्महत्येचा वार ठरला आहे.

पहिली घटना

खान शहाजील रजा खान (वय २८ रा. शहा नगर बीड बायपास)असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. शहाजील हे अविवाहित असून काही दिवसांपासून त्याच्यासाठी मुलगी बघायचे काम सुरू होते. त्यांचे वडील कस्टम ऑफिसर होते. मात्र, त्याचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्याची आई आणि तो दोघे राहत होते. तो एका कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता. (six people committed suicide) शनिवारी त्याची आई नातेवाईकांच्या लग्नासाठी गेली होती. सोमवार (दि. २८)रोजी रात्री दहा वाजता मित्रांसोबत होता. रात्री त्याने फोन घेतला नाही म्हणून मित्र घरी गेला. आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडून बघितले असता त्याने गळफास घेतला होता. यावेळी घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. युवराज हिवराळे तपास करीत आहे.

प्रेम प्रकरणाची किनार

मुलीच्या प्रकरणातून शहाजील याने आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईक वर्तवत होते. शहाजीलने रात्री आत्महत्या केली मात्र पहाटे पाचनंतर त्याच इंस्टाग्राम अकाऊंट अचानक डी ॲक्टिव झाले होते. अंत्यविधी नंतर याप्रकरणी तक्रार देण्यासंदर्भात विचार करणारा असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

दुसरी घटना

रिक्षाचालक ३६ वर्षीय तरुणाने घरातील सीलिंग फॅनला ओढानिच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि. १ मार्च)रोजी पहाटे सहा वाजता उघडकीस आली. शाम आत्माराम झळके वय ३६ रा. गवळीवाडा दौलताबाद असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. शाम विवाहित असून रिक्षाचालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली आहेत. दरम्यान सोमवार (दि. २८)रोजी घरातील सदस्यांसोबत जेवण करून शाम हे झोपले. पहाटे पत्नी उठून अंगण झाडून घेण्यासाठी बाहेर गेली. यावेळी शाम ने घरातील बेडरूममध्ये ओढणीचा सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

तिसरी घटना

आचारी काम करणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीने घरातील फॅनला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जाधववाडी परिसरातील मयूर पार्क येथे सोमवार (दि. २८)रोजी सात वाजता उघडकीस आली. राजू शिवलाल धुसिंगे (वय ४८) रा. जाधववाडी परिसर मयूर पार्क असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजू हे आचारी काम करत होते. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला आहे. यामुळे पती पत्नी व मुलगा हे तिघे राहत होते. सोमवार (दि. २८)रोजी मुलगा बाहेर गेला होता. राजू व पत्नी घरात असताना राजू यांनी घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन आतून दार लावून घेतले. बराच वेळ झाल्याने पत्नीने खिडकीतून बघितले असता त्यांनी गळफास घेतलेला होता. दरम्यान, त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

चौथी घटना

मजुरी काम करणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गल्ली न. ३ संजय नगर येथे मंगळवार दि. १ रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. विष्णू भगवानराव ढवळे (वय 43)वर्ष गल्ली नंबर 3 संजय नगर असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विष्णू हे मजुरी काम करत होते. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. सोमवार दि. २८ रोजी विष्णू हे मद्य प्राशन करून आले होते. त्यांनी पत्नीसोबत भांडण केल्याने पत्नी बहिणीच्या घरी गेल्या होत्या. पत्नी सकाळी घरी आल्या तेव्हा दार आतून लावले होते.आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. शेजारच्याच मदतीने दार तोडून बघितले असता त्याने गळफास घेतला होता. यावेळी त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पाचवी घटना

गणेश वाल्मीक गोते (वय २२) रा. रोहिणी ता. चाळीसगाव जि. जळगाव ह. मू. सिद्धेश्वर नगर असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवार दि. १ रोजी रात्री आठ वाजता किरायाच्य खोलीत सीलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

सहावी घटना

अविनाश राजू पवार वय २२ रा. जोगेश्वरी ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश याने मंगळवार दि. १ रोजी रात्री नऊ वाजता राहत्या घरातील पत्राच्या लाकडी बल्लीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ही बाब लक्षात येताच त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचा -Farmer suicide In Nagpur : स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details