औरंगाबाद - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने सरशी केल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेषतः शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेली वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत शिंदे गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे. ( Vadgaon Kolhati Gram Panchayat Election ) शिंदे गटाचे १८ पैकी ११ सदस्य निवडून आले आहेत.
आ संजय शिरसाट यांनी मारली बाजी -औरंगाबाद शहराच्या जवळ असलेली वडगाव कोल्हाटी येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची राहिली. शिंदे गटाचे विश्वासू आ संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील ही ग्रामपंचायत असल्याने ही निवडणुकी प्रतिष्ठेची मानली गेली. शिवसेनेतर्फे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासारखे नेते निवडणूक प्रचारात उतरले होते. ( victory Shinde group in Vadgaon Kolhati Gram Panchayat ) तर, दुसरीकडे शिंदे गटाचे आ संजय शिरसाट आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. त्यात विजय शिंदे गटाचा झाला. यामध्ये १७ पैकी ११ जागांवर त्यांनी बाजी मारली ते शिवसेनेला ४ तर भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. हा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवल्याने मिळाल्याचे मत शिंदे गट नियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे.