महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिल्लोड नगर परिषदेमध्ये राडा; विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

सिल्लोड नगर परिषदेच्या महिला कंत्राटी सफाई कामगारांच्या थकीत वेतनप्रकरणी मागच्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागांकडे याप्रकरणी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने या कामागरांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा फेब्रुवारीत दिला होता.

सिल्लोड

By

Published : Mar 17, 2021, 10:02 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद)- नगरपरिषदेच्या कंत्राटी महिला सफाई कामगारांच्या थकीत वेतन प्रकरणाने बुधवारी हिंसक वळण घेतले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात महिला सफाई कामगाराने आक्रमक होत विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. तर सिल्लोड नगर परिषदेमध्ये या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या हुल्लडबाजीत सफाई कामगारांसोबत असलेल्या एका जणास नगर परिषद इमारतीखाली उभ्या असलेल्या काही जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सिल्लोड नगर परिषदेच्या महिला कंत्राटी सफाई कामगारांच्या थकीत वेतनप्रकरणी मागच्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागांकडे याप्रकरणी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने या कामागरांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा फेब्रुवारीत दिला होता. परंतु, हे उपोषण होऊ शकले नाही. त्यानंतर भारतीय जनता पक्ष सिल्लोड शहर व माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्या पुढाकाराने सिल्लोड शहरातील टिळकनगर भागातील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीवर चढून विधानसभा अधिवेशन काळात महिला कामगारांनी दोन दिवस आंदोलन केले होते. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि.१७) रोजी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी बैठक बोलाविली होती.

पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

बैठकीत सिल्लोड नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र सुर्यवंशी, अजगर पठाण हे नगर परिषदेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आपल्या न्याय मागणीला उशीर होत असल्याचे पाहुन संतापलेल्या एका महिला कामगाराने सोबत आणलेले विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांनी ती वेळीच हस्तगत केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, सुरू असलेला गोंधळ पाहून, देवेंद्र सुर्यवंशी व अजगर पठाण यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. ते निघून जात असल्याचे बघून त्यांच्याच मागे महिला कामगारही निघाल्या. ही सर्व मंडळी नगर परिषद मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर यांच्या दालनात जाऊन बसली. ते तेथे नसल्याने गोंधळाला अधिकच भर पडली. काही वेळात तेथे आलेल्या नगराध्यक्षा राजश्री निकम यांच्यात व महिला कामगारांमध्ये सुद्धा वाद झाला. सफाई कामगारांसोबत असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला नगर परिषदेच्या आवारात उपस्थित असलेल्या काही जणांनी मारहाण केली. जमाव बिथरल्याचे पाहून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांना सह महिलांनी नगराध्यक्ष राजर्षी निकम व नगर परिषद कर्मचारी सोबत चर्चा करीत असताना वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी काही मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी झाली होती. तणावाच्या वातावरणात काही नागरिक एकमेकांवर धावून जात होते. परिस्थिती चे गांभीर्य ओळखून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस उपस्थिती होते.

ABOUT THE AUTHOR

...view details