औरंगाबाद :एक हिरोहोंडा स्प्लेंडर, आणि एक बुलेट अशा दोन मोटार सायकल दिनांक ११डिसेंबर २०२२ रोजी रात्री घरा समोरून अज्ञात चोरांनी चोरून नेल्या होत्या .पोलिसांनी सदर चोरीच्या मोटार सायकलचा गोपनीय रित्या शोध घेऊन आरोपी संदीप गौतम वाकिकर रा. भाबाठाण ता. श्रीरामपूर याचे ताब्यातून तीन मोटार सायकल किंमत 1,15,000/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Bike Thief : सिल्लेगाव पोलिसांनी चोरीच्या तीन मोटार सायकलसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात - सिल्लेगाव हद्दीत मोटार सायकल चोरीची घटना
गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव हद्दीतील बुट्टेवाडगाव येथील घरासमोरील दोन दुचाक्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ऋषिकेस साईनाथ तीवाडे यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला शिल्लेगाव पोलिसांनी तीन मोटरसायकलसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई : सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, श्रीकृष्ण दाणी, रमेश अपसंनवाड, उमेश गुडे, शगुन थोरे, विठ्ठल जाधव, संतोष सिरे, ज्ञानेशोर खंदारे, नासेर पठाण यांनी केली आहे.
अगोदरच्या गुन्ह्यांची माहिती घेणार : या दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला शिल्लेगाव पोलिसांनी तीन मोटरसायकलसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलिसांनी अशा घटना वारंवरा घडत असल्याने आता यावर कठरो कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती दिली आहे. तसेच, ताब्यात घेतलेल्या आरोपीने याआधी असे गुन्हे केले आहेत का अशीही माहिती घेतली जाणार आहे असही ते म्हणाले आहेत.