औरंगाबाद- मुंबईहून ड्युटी करून परतलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. रंजित चव्हाण असे या वाहकाचे नाव आहे. रंजितने त्याची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली असून सोबतच मधुमेह असल्याने मुंबईला पाठवू नये, अशी विनंती केली होती. मात्र, एसटीच्या अधिकाऱ्यांनी निलंबित करण्याची धकमी देत मुंबईला पाठवले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
विनंती करूनही पाठवले कामावर -
मुंबईला गेल्यावर दोन दिवसात तब्येतीमुळे रंजित चव्हाण परत आले. आल्यावर तब्येत खराब असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. निलंबित करण्याची धमकी देऊन कामावर पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. इतकेच नाही, तर मृत रंजित यांच्या कुटुंबाची जबाबदारी परिवहन विभागाने घ्यावी, तसेच मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांना केली घेतली होती.