गंगापूर(औरंगाबाद) -तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेपासtन लाभार्थी वंचित राहून बोगस लाभार्थ्यांना फायदा मिळत असल्याचा आरोप करत लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय गाठून गोंधळ केला. संबधीत विभागाचे अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने तालुक्याच्या ठिकाणाहून आलेल्या वयोवृद्धांना निराश होऊन रिकाम्या हातांने माघारी जावे लागत असून वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे.
अनेक दिवसांपासून मानधन थकीत
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ याजनेचे मानधन मागील बऱ्याच दिवसांपासून थकीत होते. या योजनेचे लाभार्थी वयोवृद्ध व निराधार असल्याने तहसील कार्यालयात चकरा मारूनही काही मानधन मिळत नव्हते आणि दुसरीकडे कोरोनामुळे हाताला काम नसल्याचे पैशाची चणचण भासत असल्याने त्रस्त आहेत. यामुळे काहींनी गंगापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव डॉ. आबासाहेब सिरसाट यांना भेटून या प्रकरणात मदत करण्याची मागणी केली. आबासाहेब सिरसाट यांनी सर्व लाभार्थ्यांसह तहसील कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत लाभार्थ्यांना वेठीस धरण्याचे कारण विचारले. दोन दिवसांत मानधन देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी अश्वाशीत केले.
हेही वाचा -कंपनी मालकाचा कामगार महिलेचा घरी जाऊन विनयभंग; वाळूज पोलिसांकडून आरोपीला अटक