पैठण (औरंगाबाद) - नगर परिषद आणि तालूका प्रशासनाने पैठण शहर हद्दीत काही अस्थापनांना अटी व शर्ती लागू करत ग्राहकांना सेवा देण्यास शूक्रवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून हिरवा कंदील दाखविला. त्यानूसार अत्यावश्यक सेवांच्या दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाना, भाजीपाला केंद्र, पिठाच्या गिरण्या याशिवाय अन्य काही दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
काही दुकानदारांनी शनिवारी सकाळी सात वाजताच आपल्या दुकानांची स्वच्छता करूनच उघडली. यामध्ये अनेक दूकाने जवळपास ४५ दिवसांनी प्रथमच उघडली आहेत. यामध्ये पादत्राणे, जनरल स्टोअर्स व शैक्षणिक साहित्य दुकानांचा प्रामुख्याने समावेश होता. सायंकाळी सात वाजेपर्यंत या दुकाने सुरू राहणार आहेत. या दूकानासमोर सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या व त्या दॄष्टीने अवश्यक खबरदारी उपाययोजना तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.