महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत दारूविक्रीसाठी पोलीस बंदोबस्त देण्याची दुकानदारांची मागणी - police protection for liquor sell aurangabad news

एक जूनपासून औरंगाबाद शहरात ऑनलाइन पद्धतीने तर ग्रामीण भागात थेट विक्री सुरू करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच दिवशी मद्यपींनी दुकानासमोर गर्दी केली. होम डिलिव्हरी देण्यास विरोध करत थेट विक्री करण्याची मागणी ग्राहकांनी केली. लोकांनी गर्दी केली असताना होम डिलिव्हरी करणाऱ्याच्या हातातील बॅग ओढण्याचा प्रयत्न झाल्याने दुसऱ्या दिवशी वाईन शॉपमालकांनी विक्री बंद केली आहे.

दारू विक्रीसाठी पोलीस बंदोबस्त
दारू विक्रीसाठी पोलीस बंदोबस्त

By

Published : Jun 2, 2020, 6:38 PM IST

औरंगाबाद - शहरात सुरू करण्यात आलेली ऑनलाइन दारूविक्री दुकाने मालकांनी बंद केली आहे. ऑनलाइन सेवा देत असताना येणाऱ्या अडचणीत पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी दुकान चालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.

मार्च महिन्यात जिल्ह्यातील दारू दुकाने जिल्हा प्रशासनाने बंद केली होती. तर, मे महिन्यात राज्यातील दारू दुकान उघडण्यास सशर्त परवानगी देण्याली होती. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील दारू दुकानांना परवानगी देण्यात आली नव्हती. आता लॉकडाऊन 4 संपल्यावर दारू दुकान सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, शहरात ऑनलाइन पद्धतीने तर, ग्रामीण भागात थेट विक्रीला सुरुवात झाली. मात्र, शहरात मद्यपींनी अनेक दुकानांसमोर गर्दी केली आणि ऑनलाइन दारू न देता थेट विक्री करण्याची मागणी ग्राहकांनी केली. मात्र परवानगी नसल्याने वाईन शॉपमालकांनी नकार दिला. यावर काही ठिकाणी घरपोच दारू नेणाऱ्या सेल्समनच्या हातातील बॅग लोकांनी ओढण्याचा प्रयत्न केला, तर गारखेड्यात एका दुकानावर लोकांनी दगडफेक केली.

असे प्रकार होत असताना पोलिसांनी दारू दुकानांवर कारवाई करण्याची तंबी दिल्याने दुसऱ्या दिवशी दारूविक्री बंद करण्यात आली. थेट दुकानातून दारू विक्रीला परवानगी द्या, त्यासोबत काही दिवस पोलीस बंदोबस्त द्या, अशी मागणी दारू दुकानदारांनी केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, राज्य उत्पादक शुल्क विभाग आणि पोलीस आयुक्तांना या येणाऱ्या अडचणींचे निवेदनदेखील संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details