औरंगाबाद -येथील औरंगाबाद-नांदगाव नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शिऊर बंगला (ता.वैजापूर) फाट्यावर रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान नांदगावहून येणाऱ्या शिवशाही बस आणि कारचा समोरासमोर अपघात घडल्याची घटना घडली. या अपघातात प्रवासी कीरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे नांदगाव नाशिककडून येणारी शिवशाही बस औरंगाबादकडे जात असताना विरुध्द दिशेने येणारी स्विफ्ट कारसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सदरील घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पुढील मदतकार्य करुन वाहतूक सुरळीत केली.