महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sillod By Election : सिल्लोड नगर पालिका पोट निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय - BJP

सिल्लोड हरातील नगर पालिका ( Sillod Nagar Palika ) प्रभाग क्र. 12 (अ) च्या पोटनिवडणुकीत ( Sillod By-Election ) शिवसेनेच्या उमेदवार फातमाबी जब्बारखान पठाण यांनी दणदणीत विजय ( Shivsena Won) मिळविला आहे. मागील निवडणुकीत 500 मतांनी ही जागा विजयी झाली होती.

Sillod By Election
Sillod By Election

By

Published : Dec 22, 2021, 6:54 PM IST

Updated : Dec 22, 2021, 9:50 PM IST

सिल्लोड ( औरंगाबाद ) - शहरातील नगर पालिका ( Sillod Nagar Palika ) प्रभाग क्र. 12 (अ) च्या पोटनिवडणुकीत ( Sillod By Election ) शिवसेनेच्या उमेदवार फातमाबी जब्बारखान पठाण यांनी दणदणीत विजय ( Shivsena Won ) मिळविला आहे. मागील निवडणुकीत 500 मतांनी ही जागा विजयी झाली होती. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या पोटनिवडणुकीत तब्बल 1 हजार 700 मतांची आघाडी घेवून या प्रभागात आपले वर्चस्व कायम ठेवले.

सिल्लोड नगर पालिका पोट निवडणुकीत शिवसेनेचा विजय

इतकी मिळाली मते

या निवडणुकीत एकूण 2 हजार 799 जणांनी मतदान केले होते. यापैकी शिवसेनेला 2 हजार 19 मते मिळाली. तर भाजपला 210, काँग्रेसला 53, राष्ट्रवादीला 26, एमआयएमला 79 आणि वंचित आघाडीला 389 मते मिळाली.

सहा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

या निवडणुकीत 7 पैकी 6 जणांचे अनामत रक्कम जप्त झाल्याने शिवसेनेचा ऐतिहासिक विजय झाला. भाजपसह ( BJP ) इतर उमेदवारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

मतदारांचे मानले आभार

शिवसेना उमेदवार फातमाबी पठाण यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्र. 12 मध्ये फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे , गुलाल व पुष्पांची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नॅशनल सूत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार आदी पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार फातमाबी पठाण यांनी प्रभाग क्र. 12 मधील आदी भागातील मतदारांच्या भेटी घेत आभार मानले.

प्रभाग क्र. 12 मधील विजय म्हणजे विकासाला चालना देणार

शहरातील मतदारांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच शिवसेनेवर विश्वास दाखवला त्यामुळे या शहरात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले, हा विजय विकासाला चालना देणारा असल्याचे प्रतिपादन यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.

नगर परिषदेच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार

विजयी उमेदवार फातमाबी पठाण यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर तसेच मतदारांचे आभार मानले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील लोकांच्या अडीअडचणी सोडविणे तसेच त्यांना नगर परिषदेच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात मी कमी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी फातमाबी पठाण यांनी दिली.

हे ही वाचा -Ancient Coins Aurangabad : प्रियदर्शनी उद्यान खोदकामात आढळली 1689 प्राचीन नाणी

Last Updated : Dec 22, 2021, 9:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details