औरंगाबाद -सोयगाव नगरपंचायतीवर (Soygaon Nagar panchayat election) शिवसेनेने (Shivsena) 17 पैकी 11 जागेवर विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजपला (BJP) केवळ 6 जागेवर विजय मिळवता आला आहे. निकालानंतर शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
यावेळी प्रथमच सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -
वॉर्ड क्र. 1 शिवसेना - शाहिस्ताबी राउफ विजयी
वॉर्ड क्र. 2 - शिवसेना- अक्षय काळे विजयी
वॉर्ड क्र. 3 - शिवसेना- दीपक पगारे विजयी
वॉर्ड क्र.4 - शिवसेना- हर्षल काळे विजयी
वॉर्ड क्र.5 - भाजप - वर्षा घनगाव विजयी
वॉर्ड क्र.6 - शिवसेना - संध्या मापारी विजयी
वॉर्ड क्र.7 - भाजप - सविता चौधरी विजयी
वॉर्ड क्र.8 - शिवसेना - कुसुमबाई राजू दुतोंडे विजयी