औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही निर्बंध राज्यात लावण्यात आले आहेत. त्यात सामाजिक, राजकीय कोणतेही जाहीर कार्यक्रम करू नये,अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. शिवसेना आमदार संजय शिरसाठ लोकडाऊन काळात यांनी वाळूज येथे पाण्याच्या पाईपलाईनचे पूजन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारचे नियम सर्व समान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाळूज येथे जाहीर कार्यक्रम -
लॉकडाऊन काळात सकाळी 7 ते 11 यााकाळात आवश्यक सेवा सरकारने सुरू ठेवल्या आहेत. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. अस असताना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास वाळूज एमआयडीसी येथील जय भवानी नगर येथे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत जल योजनेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठया प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. कोरोनामुळे विवाह सोहळे 25 लोकांमध्ये करावे लागत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार गर्दी करून कार्यक्रम घेत असतील तर लोकप्रतिनिधींना नियम नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेना आमदाराकडून लॉकडाऊनचे नियम धाब्यावर.. हजारोंच्या उपस्थितीत जलयोजना कार्यक्रमांचे आयोजन - औरंगाबाद करोना नियम धाब्यावर
कोरोनामुळे विवाह सोहळे 25 लोकांमध्ये करावे लागत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार गर्दी करून कार्यक्रम घेत असतील तर लोकप्रतिनिधींना नियम नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
![शिवसेना आमदाराकडून लॉकडाऊनचे नियम धाब्यावर.. हजारोंच्या उपस्थितीत जलयोजना कार्यक्रमांचे आयोजन नळ पूजन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-06:32:53:1619442173-mh-aur-2-sena-mla-programe-7206289-26042021131605-2604f-1619423165-12.jpg)
आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी -
लॉकडाऊन काळात जाहीर कार्यक्रम केल्याप्रकरणी उपस्थितांवर कारवाई प्रशासनाने करावी अन्यथा जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरून जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी डावात मचाळा पार्टीचे भरत फुलारी यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे राज्यातील जनतेला नियम पाळा अस सांगतात. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार नियम मोडत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आमदारांवर कारवाई करावी अन्यथा त्यांनी प्रकरणावर डोळे झाक केली म्हणून जिळधिकाऱ्यांवर विभागीय आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी भरत फुलारी यांनी केली आहे.