औरंगाबाद- कोविड-19 ची लस घेतल्याबद्दल मोदींजींचे अभिनंदन केले पाहिजे. आता राष्ट्रपती देखील घेतील मी पण घेणार आहे. सर्व जनतेला लस मिळणार आहे. लस घेऊन आपण जनतेला विश्वास निर्माण केला पाहिजे. बायडेन यांनी देखील लस घेऊन जनतेत विश्वास निर्माण केला होता, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
मोदी सरळ मार्गी नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यावर त्यांनी अंगावर घेतलेला गमछा आणि लस देणाऱ्या नर्स यावरून निवडणुकीचे राजकारण होत असल्याची चर्चा होत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहा, असा सल्ला संजय राऊत यांनी विरोधकांना दिला. मोदी हे सरळ मार्गी नेते आहेत, अशी पृष्टी देखील संजय राऊत यांनी जोडली.
विरोधकांची प्रत्येक मागणी मान्य करावी असे काही नसते
संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या आमदारकीचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र विरोधकांची प्रत्येक मागणी मान्य करावी, असे काही नसते. संजय राठोड कट्टर शिवसैनिक आहेत. आम्ही देखील केंद्र सरकारकडे अनेक मागण्या करत असतो. मात्र त्या पूर्ण होतात का? याआधी आम्ही पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे, जीएसटीचा थकीत निधी आम्हाला मिळावा, अशा अनेक मागण्या आम्हीकेल्या आहेत. मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत. प्रत्येक मागणी पूर्ण करारी, असे काही नसते, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा -'यूपीएच्या पुनर्गठणाची गरज; शरद पवारांनी नेतृत्व केल्यास अनेक पक्ष एकत्र'
हेही वाचा -औरंगाबादेत आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याची अफवा; परीक्षार्थींचा उडाला गोंधळ