औरंगाबाद- राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Minister Of State Abdul Sattar ) यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सत्तार यांना नाही तर युतीबाबत फक्त उद्धव ठाकरेच बोलतील इतर कोणीही नाही, असे मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ( Chandrakant Khaire on Shivsena BJP Alliance ) व्यक्त केले.
काय म्हणाले होते सत्तार..?
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत जाऊन गडकरी यांची भेट घेतली. रस्ते कसे बांधायचे आणि पूल कसे उभारायचे हे गडकरी यांना चांगलेच माहिती आहे. कधी कोणता पूल बांधण्याचा यांचा ज्ञान त्यांना आहे. त्यामुळे सेना भाजपमधला पूल तेच बांधू शकतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जर युतीबाबत बोलणी केली, तर निश्चितच मार्ग निघू शकतो. मात्र, याबाबत सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले होते.