महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2020, 9:59 AM IST

ETV Bharat / state

नऊ वर्षानंतर भरला शिवना टाकळी मध्यम प्रकल्प, 3 दरवाज्यातून 720 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

नदिला कन्नड मंडळात अतिवृष्टी झाल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दि. १ ऑगस्टला सकाळी दहा वाजता आमदार उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते जलपूजन करून नदी पात्रात प्रकल्पाचे दोन दरवाजे वर करून पाणी सोडण्यात आले.

shivna river flood condition due to heavy rain
shivna river flood condition due to heavy rain

कन्नड- (औरंगाबाद) - तालुक्यातील सर्वच मंडळात दररोज जोरदार पाऊस पडत आहे. कन्नड मंडळात मध्यरात्री झालेल्या पावसाची १०२ मिमी नोंद झाल्याने शिवना नदिला मोठा पूर आला आहे. या मुळे साठ टक्के पाणी साठा झालेल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्प पूर्ण भरल्याने तीन दरवाजेद्वारे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. तर 720 क्यूसेस ने तीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी जायकवाड़ी धरणात जात असते.

कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्प आत्ता 98 टक्के भरलेला असून पाण्याची आवक चालू असल्याने पोलीस ठाणे देवगाव रंगारी जलसंपदा विभाग, शिवना टाकळी मध्यम प्रकल्प कार्यालयाच्या वतीने नदीकाठच्या टाकळी, लव्हाळी,बोरसर खु,बोरसर बु.,शेवता,लामणगाव,झोलेगाव,लाखणी,मांडकी,सनव,देवळी,वैरागड,लासुरगाव विशेषतः नदीकाठच्या रहिवासी यांना सतर्क राहुन काळजी घेण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा व कर्मचारी यांनी अवगत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प समजल्या जाणाऱ्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात दररोज पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने प्रकल्प शंभर टक्केच्या जवळपास भरला आहे. त्यात शिवना व गांधरी, ब्राम्हणी, या नदिला कन्नड मंडळात अतिवृष्टी झाल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आसल्याने दी १ ऑगस्टला सकाळी दहा वाजता आमदार उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते जलपूजन करून नदी पात्रात प्रकल्पाचे दोन दरवाजे वर करून पाणी सोडण्यात आले.

यावेळी पाटबंधारे उपविभागिय अभियंता राजेंद्र थोरवे, शाखा अभियंता पुरुषोत्तम कडवे, एस बी आहेर, जे के पठाण, लक्ष्मण ठुबे,प्रकाश शेळके, तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची उपस्थीती होती.

नऊ वर्षानंतर प्रकल्प पूर्ण भरल्याने तसेच पाणी खाली नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती पंचक्रोशीतील शेतकरी नागरिकांना मिळाल्याने सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात शेतकरी तरुण वर्ग प्रकल्पावर जमा झाले होते.

प्रकल्पातील पाणी सोडण्याचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण तसेच आमदार उदयसिंग राजपूत जलपूजन करिता येणार आसल्याने कार्यकर्ते, तर प्रकल्प भरला म्हणून समाधानी झालेले शेतकरी या सर्वांची प्रकल्पावर मोठी गर्दी झाली होती. त्यात बंदोबस्तकरता पोलिसांची संख्या कमी असल्याने कोरोना सोशल डिस्टिंगचा सर्वाना विसर पडलेला दिसून आला.

ABOUT THE AUTHOR

...view details