महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एक हात मदतीचा : पूरग्रस्तांसाठी सिल्लोड येथे शिवसेनेच्या वतीने मदत फेरी - shivsena initiative

अतिवृष्टीमुळे राज्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले. तर या परिस्थितीमुळे या भागातील नागरिकांची वाताहत झाली आहे.

Shiv Sena's relief drive for flood victims in Sillod
पूरग्रस्तांसाठी सिल्लोड येथे शिवसेनेच्या वतीने मदत फेरी

By

Published : Jul 27, 2021, 8:26 PM IST

Updated : Jul 27, 2021, 10:31 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद) -"एक हात मदतीचा" या उपक्रमातून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सिल्लोड येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली. या माध्यमातून सिल्लोडमधून पूरग्रस्तांना 11 लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सांगितले. ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते.

उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रतिक्रिया

शिवसेना, युवासेनेचे आवाहन -

अतिवृष्टीमुळे राज्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले. तर या परिस्थितीमुळे या भागातील नागरिकांची वाताहत झाली आहे. त्यामुळे या भागातील पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी सिल्लोड येथे शिवसेना, युवासेनेच्या वतीने "एक हात मदतीचा" या उपक्रमांतर्गत शहरात मदत फेरी काढून पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

देशात किंबहुना राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली त्यावेळी सिल्लोडहुन पीडितांना मदत करण्याचे काम झाले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळ, सिल्लोड नगरपरिषद, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती, युवा व्यापारी प्रतिष्ठान, व्यापारी महासंघ अशा विविध संस्था तसेच व्यापारी बांधवांच्या माध्यमातून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सिल्लोडहुन 11 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असल्याची माहिती यावेळी अब्दुल समीर यांनी दिली. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असून आपण रोख किंवा धनादेशाने ही मदत देऊ शकतात. सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहनही समीर यांनी केले.

हेही वाचा -ऑगस्ट महिन्यात तब्बल 15 दिवस बॅंका राहणार बंद, जाणून घ्या तारखा...

यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा.लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, युवासेनाचे कैलास जाधव, अक्षय मगर, धर्यशील तायडे, शिवा टोम्पे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, आदीची उपस्थित होते.

Last Updated : Jul 27, 2021, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details