महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्याचा शिवसेनेचा निर्धार

भाजपाला त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहून येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकविण्याचा निर्धार सिल्लोड येथील शिवसेनेच्या आढावा बैठकीत करण्यात आला.

शिवसेनेचा निर्धार
शिवसेनेचा निर्धार

By

Published : Aug 10, 2021, 7:16 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद) - केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी, शेतमजूर हवालदिल झालेला असून भाजपाला त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहून येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकविण्याचा निर्धार सिल्लोड येथील शिवसेनेच्या आढावा बैठकीत करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, विधानपरिषद सदस्य तथा जिल्हाप्रमुख आंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

येत्या निवडणुकीत भाजपला नेस्तनाबूत करा -

शिवसेनेचा विश्वासघात करणारा भाजपा आपला प्रमुख शत्रू असून येत्या निवडणुकीत भाजपाला नेस्तनाबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी यावेळी उपस्थितांना केले. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी असे अनेक संकटे उभे राहिले असतांना अतिशय संयमाने ही परिस्थिती हाताळून कुटुंब प्रमुखांप्रमाणे मुख्यमंत्री या संकटात मदतीला धावून आले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू घरपोच जावून दिले. शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे असे स्पष्ट करीत मराठवाड्यात शिवसेना संघटन वाढीसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याने यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घ्यावा असे विनोद घोसाळकर म्हणाले.

आगामी निवडणुकांत शिवसेना बाजी मारेल -

बैठीकस मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपावर जोरदार फटकेबाजी करीत गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मतदार संघातील विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. भाजप विरोधी लोकांमध्ये प्रचंड रोष असून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती मुळे शिवसेनेची लोकप्रियता वाढत आहे असे स्पष्ट करीत कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असते. येणाऱ्या निवडणुकीत तमाम शिवसैनिक मागे हटणार नाही. आगामी निवडणुकीत सोयगाव नगर पंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर शिवसेनेचा निर्णायक भगवा फडकेल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

भाजपा कपट, कारस्थान करणारा पक्ष

भाजपा हा कपटी , कारस्थान करणारा पक्ष असून भाजपाच्या नेत्यांनी खोटे बोलण्याचा कळस गाठला आहे, असा घणाघात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी या बैठकीत भाजपवर केला. भाजपाने मराठा ओबीसी समाजाला न्याय देण्याऐवजी राजकारण केले. भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला असून भाजप विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याने येत्या निवडणुकीत भाजपला डिपॉझिट ही परत मिळणार नाही यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठावे असे आवाहन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले. तसेच संघटन मजबूत असेल तर बालेकिल्ला व्हायला वेळ लागत नाही. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा संघटन वाढीवर मोठा भर दिला असून त्यांच्या राजकीय डावपेच बाबत कोणी हात धरु शकत नाही असे स्पष्ट करीत येत्या सोयगाव नगर पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला उमेदवार शोधावे लागतील असे आव्हान राज्यमंत्री अब्दुल सत्तार भाजप समोर उभे करतील असे आ. आंबादास दानवे म्हणाले तर केंद्रातील भाजप सरकारची भूमिका जनसामान्यांच्या विरोधात आहेत. अशा लोकांना स्थानिक संस्था निवडणूक पासून रोखले तर ते पुढे पायउतार होतील असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने आपण केलेली विकासकामे आणि करणार असलेला विकास हे तळागळातील मतदारांपर्यंत पोहोचवून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा असे आवाहन जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details