औरंगाबाद (पैठण) - पेट्रोल डिझेलच्या दरासह गॅस दरवाढीचाही भडका उडाला आहे. याचा मोठा फटका शेतकरी, गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या दरवाढीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण नसल्याने डिझेल, पेट्रोल, गॅसची दरवाढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या दरवाढी विरोधात पैठण येथे शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात पैठण येथे शिवसेनेची निदर्शने - petrol, diesel, gas price hike protest
डिझेल, पेट्रोल, गॅसची दरवाढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या दरवाढीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही. या दरवाढी व महागाई विरोधात पैठण येथे शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
पैठणमध्ये शिवसेनेची निदर्शने..
पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या घरात गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दुचाकी वापरणे कठीण झाले आहे. या पेट्रोल दरवाढीचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. तर दुसरीकडे डिझेलचेही दर वाढत आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांसह शेती उपयुक्त ट्रॅक्टरसारखी वाहने वापरणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. तसेच शेती मशागतीचे गणित पूर्णपणे बिघडल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. तर गॅसवरील सबसिडी बंद केल्यामुळे गृहिणींना मोठा फटका बसला आहे. या इंधन दरवाढ व महागाईविरोधात पैठण बसस्थानक परिसरात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व अर्थ सभापती विलास भुमरे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ही केलेली दरवाढ लवकरात लवकर कमी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -नाना पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड