औरंगाबाद- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षीय बलाबल पाहता युतीच्या उमेदवाराचा विजय पक्का मानला जात असला, तरी अपक्षांवर उमेदवारांची भिस्त असणार आहे.
काँग्रेस पक्षातून अद्याप कोणत्याही अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही. तरी, अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन विजय मिळवला येईल, असा विश्वास काँग्रेसला आहे. मात्र, असे असले तरी पैशांच्या घोडेबाजारात टिकणाऱ्या उमेदवाराला काँग्रेस उमेदवारी जाहीर करणार असण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आमदार निवडीची प्रक्रिया 19 ऑगस्टला पार पडणार आहे.