छत्रपती संभाजीनगर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीने औरंगाबादचे नाव शनिवारी छत्रपती संभाजीनगर बदलल्याने त्या निषेधार्थ आंदोलन पुकारले. त्याला प्रत्यूत्तर म्हणून आमदार शिरसाट यांनी हे विधान केले आहे. जर त्यांचे औरंगजेबावर इतके प्रेम असेल तर औरंगजेबची कबर हैद्राबादला हलवा. त्यांना तेथे स्मारक बांधू द्या किंवा त्यांना हवे ते करू द्या, कोणीही त्रास देणार नाही, परंतू हे आंदोलन थांबवा, असे शिरसाट यांनी जाहीर केले.
समाजात असंतोष निर्माण करण्याचा हेतू : छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे अध्यक्ष शारेक नक्शबंदी शिरसाटांची मागणी केवळ राजकारण आणि त्यांचे स्थान मजबूत करण्यासाठी केला आहे. समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर त्यांच्या मनात औरंगजेबाबद्दल इतका द्वेष असेल, तर मग त्यांनी जी-20 प्रतिनिधींना औरंगजेबाची पत्नी राबिया-उल-दौरानी यांची 1668 मध्ये बांधलेली समाधी पाहण्यासाठी का घेऊन गेले. तसेच त्यांचा मुलगा मुहम्मद आझम शाह याने बांधलेली 'बीबी का मकबरा' पाहण्यासाठी का नेले? असा प्रतिवाद शारेक नक्शबंदी यांनी केला.