गंगापूर(औरंगाबाद) -निवडणुका म्हटलं की मतदारांना अनेक प्रलोभन दिली जातात मात्र निवडणुकीच्या काळात कुणालाही दारू ( Drink alcohol ) पाजणार नाही अशी शपथ ग्रामस्थांच्या साक्षीने गंगापूर तालुक्यातील शिरेसायगाव ( Gram Panchayat Election Shiresaigaon ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ( Gram Panchayat Elections ) अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने घेतली आहे. सुनील नेमाने असे शपथ घेतलेल्या उमेदवाराचे नाव आहे. गंगापूर तालुक्यात ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी ( Gram Panchayat elections are going on ) सुरू झाली असून गावगाड्याचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे या निवडणुकीत सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार असल्याने सरपंच पदाच्या उमेदवाराची धावपळ पहायला मिळत आहे.
Gram Panchayat Election : उमेदवाराने घेतली ग्रामस्थांच्या साक्षीने कुणालाही दारू न पाजण्याची शपथ
गंगापूर तालुक्यातील शिरेसायगाव ( Gram Panchayat Election Shiresaigaon ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ( Gram Panchayat Elections ) अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने कुणालाही दारु पाजणार नाही अशी शपथ घेतली ( Drink alcohol ) आहे. सुनील नेमाने असे शपथ घेतलेल्या उमेदवाराचे नाव आहे.
दारू न पाजण्याची उमेदवाराने घेतली शपथ - गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव येथील ( Shiresaigaon village panchayat ) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले सुरेश नेमाने यांनी ग्रामस्थांच्या साक्षीने कुणालाही दारू न पाजण्याची शपथ घेतली आहे तसेच गावात व्यसनासाठी प्रोत्साहन देणारे अवैद्य धंदे दारू विक्री बंद करणार, गावातील व्यसना त अडकलेल्यांना व्यसनापासून दूर करणार व गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी ग्रामस्थांच्या साक्षीने सांगितले आहे
तालुक्यात ३१ ग्रामपंचायतीची निवडणूक -गंगापूर तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यात एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. उर्वरित ३१ ग्रामपंचायतीची सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सरपंच सदस्य पदासाठी १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.