छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी वरळी येथे झालेल्या जाहीर सभेत शिंदे गटाच्या विरोधात त्यांचाच मित्र पक्ष घोटाळ्याचे पुरावे देतो असा आरोप केला. G 20 परिषदेच्या ऐन वेळी नागपूर येथील जमीन घोटाळ्याचे पुरावे दिले असे त्यांनी सांगितले. अधिवेशनात अनेक खुलासे होतील. मंत्रिमंडळ विस्तार आधी सरकार कोसळेल असा दावा त्यांनी सभेत केला. त्यामुळे चर्चांना उधाण आले. त्यावर शिंदे गटाचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी टीका केली.
भाजपला बदनाम करु नका: आदित्य ठाकरे यांच्या टिकाबाबत विचारले असता, पालकमंत्री संदीपन भुमरे यांनी आदित्यची खिल्ली उडवली, किमान एखादा घोटाळा तरी यांनी उघड करावे. घोटाळा झाला ते सिद्ध तर करा आणि नंतर बोलावे. विनाकारण याने हे केले ते केले, अस म्हणत चुकीची माहिती देऊ नका. भाजप आणि शिवसेना एकत्र काम करतात. अस कुठलेही काम भाजप करत नाही. विनाकारण भाजपला बदनाम करत आहेत. यांनी कितीही सांगितले तर फरक पडणार नाही. असा उत्तर संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले केली.
आदित्य ठाकरे यांनी भुमरे यांच्यावर केली होती टीका:एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी भुमरे यांच्या मतदार संघात त्यांनी सभा घेत टीका केली होती. त्यानंतर दोनदा आदित्य पैठण येथे येऊन गेले. या दौऱ्यावर संदीपान भुमरे यांनी तीव्र टिका केली होती. त्यामुळे त्यांच्यातील शाब्दिक टीका याधीही पाहायला मिळाला होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. परंतु संदीपान भुमरे हे जी- २० परिषदेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाही.जी-२० देशांची वुमेन परिषद २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. तर या परिषदेचा कार्यक्रम हॉटेल रामामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे आदींची उपस्थिती होती. तर अधिवेशनात मुख्यमंत्री विरोधकांना देशद्रोही कसे म्हणू शकतात, असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यांनी देशद्रोही नेमके कोण याची माहिती द्यावी. असे सांगून विरोधकांनी मुख्यमंत्री विरोधात जोरदार घोषणाबाजी विधानपरिषदेत केली. सरकारचा धिक्कार.. तानाशाही नही चलेगी अशी जोरदार घोषणाबाजी.
हेही वाचा:Maharashtra Budget Session अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अतिरिक्त खाते इतर मंत्र्यांकडे वळवण्यात आली या मंत्र्यांकडे अतिरिक्त भार