महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाठलाग करून दोन दरोडेखोरांना शिल्लेगाव पोलिसांनी केले जेरबंद - aurangabad crime news

या गुन्हेगारांनी पोलीस ठाणे शिल्लेगाव, वैजापूर, वाळूज, गंगापूर हद्दीत चोरी, जबरी चोरी, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले असून ते वरील पोलीस ठाणे येथे फरारी म्हणून घोषित आहेत.

robbers arrested in aurangabad
robbers arrested in aurangabad

By

Published : Jun 30, 2021, 5:41 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस स्टेशन हद्दीच्या परिसरात व इतर ठिकाणी चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांची शिल्लेगाव पोलिसांनी गुप्तरित्या माहिती काढून त्यांचा पाठलाग करून ताराचंद विरुपन भोसले, शक्तूर भोसले (दोघे रा. गाजगाव, ता. गंगापूर) या कुख्यात दरोडेखोरांच्या मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पाठलाग करून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

चोरी, जबरी चोरीतील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

या गुन्हेगारांनी पोलीस ठाणे शिल्लेगाव, वैजापूर, वाळूज, गंगापूर हद्दीत चोरी, जबरी चोरी, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले असून ते वरील पोलीस ठाणे येथे फरारी म्हणून घोषित आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस अंमलदार रमेश अफसनवाड, सविता वरपे, मनोज नवले, विठ्ठल जाधव, मनोज औटे, सचिन चव्हाण, शुभम पालवे, संतोष गिरी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details