महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चीन येथे होणाऱ्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी शेख शाकिर याची निवड - चीनमध्ये जागतिक तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन

गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख शाकीर याची चीन येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रविवारी अमृतसर येथील गुरुनानक देव विद्यापीठामध्ये निवड चाचणी पार पडली. यामध्ये शेख शाकीर याने कांस्य पदक पटकावल्याने त्याची जागतिक विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

Sheikh Shakir selected for World Fencing Championships
शेख शाकिर

By

Published : Mar 2, 2021, 1:21 AM IST

गंगापूर(औरंगाबाद)गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख शाकीर याची चीन येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रविवारी अमृतसर येथील गुरुनानक देव विद्यापीठामध्ये निवड चाचणी पार पडली. यामध्ये शेख शाकीर याने कांस्य पदक पटकावल्याने त्याची जागतिक विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

7 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग

दरम्यान शेख शाकीर याने आतापर्यंत 7 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असून, त्याने या स्पर्धांमध्ये 2 सुवर्ण पदक तर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत 1 कांस्य पदक पटकावले आहे. तसेच त्याने १५ राज्यस्तरीय स्पर्धांपैकी ११ स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.

शेख शाकीरचे मान्यवरांकडून अभिनंदन

शेख शाकीर याच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण, तसेच म. शि. प्र. मंडळाच्या केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माजी आमदार लक्ष्मण मनाळ, संजय जाधव, प्रशांत माने, विश्वजित चव्हाण, वाल्मीक शिरसाठ, इकबाल सिद्दीकी, संतोष काळवणे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details