महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत सिनेस्टाईलने पाठलाग करून युवकावर तलवारीने हल्ला

औरंगाबादेतील आडगाव-निपाणी येथील रहिवासी परमेश्वर वाघ आणि शिवाजीनगर भागात राहणारे नितीन प्रकाश जाधव यांच्यामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी भांडण झाले होते. त्याच वादातून नितीनने वाघ यांच्यावर हल्ला केला आहे.

युवकावर हल्ला करताना हल्लेखोर

By

Published : May 31, 2019, 9:45 AM IST

Updated : May 31, 2019, 10:50 AM IST

औरंगाबाद- शहरातील सिल्लेखाना चौकात हल्लेखोरांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून युवकावर धारदार तलावरीने वार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात ३ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.

युवकावर तलवारीने हल्ला करताना हल्लेखोर

जिल्ह्यातील आडगाव-निपाणी येथील रहिवासी परमेश्वर वाघ आणि शिवाजीनगर भागात राहणारे नितीन प्रकाश जाधव यांच्यामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी वाघ यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने नितीनवर हल्ला केला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच हा खटला न्यायालयातही सुरू आहे.

याप्रकरणी गुरुवारी न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी वाघ हे रामेश्वर गवारे, शार्दुल गावंडे यांच्यासोबत जिल्हा न्यायालयात आले होते. नितीनही आपल्या साथीदारांसोबत न्यायालयात आला होता. सुनावणी झाल्यानंतर पुढची तारीख देण्यात आली. त्यानंतर वाघ हे सिल्लेखाना मार्गे घरी जात होते. त्यावेळी नितिनने त्यांना सिल्लेखान चौकात अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये परमेश्वर वाघ यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले गवारे आणि गावंडे दोघेही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

Last Updated : May 31, 2019, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details