महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kapil Patil On Sharad Pawar : 'विरोधी पक्षाची एकजूट ठेवण्यात शरद पवारांची भूमिका मोठी' - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राज्यातील विरोधी पक्षाची एकजूट ठेवण्यात शरद पवारांची भूमिका मोठी (Sharad Pawar important role in opposition parties) असेल. ते नेहमी इंडिया आघाडीसोबतच राहतील असे मत आमदार कपिल पाटील यांनी म्हटले आहे. ते आज औरंगाबादेत बोलत होते.

Kapil Patil On Sharad Pawar
Kapil Patil On Sharad Pawar

By

Published : Aug 13, 2023, 10:06 PM IST

आमदार, कपिल पाटील यांची प्रतिक्रिया

औरंगाबाद : शरद पवारांची राज्यातील विरोधी पक्षांची एकजूट (Unity of opposition parties in state) ठेवण्यात मोठी भूमिका असेल, यात शंका नाही असे मत जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी व्यक्त केल. मोठ्या राजकीय पक्षांबद्दल बोलण्यात इतका मी मोठा नाही. मात्र, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी शरद पवार बांधील आहेत, धर्मनिरपेक्ष अशी त्यांची भूमिका नेहमीच राहिली आहे. ते नेहमी इंडिया सोबतच राहतील असे मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते.

भिडे - पोंक्षे नथुरामी मंडळी :महाराष्ट्रात भिडे आणि नथुरामी मंडळी सध्या महापुरुषांवर हल्ला करत आहेत. महापुरुषांचा अवमान त्यांच्याकडून (Insulting a great man by Bhide) सातत्याने होत आहे. हल्ल्याचे स्वरूप खूप वाईट आहे, महापुरुषांची चिकित्सा करावी, मात्र त्याला काही मर्यादा असते, असे देखील कपील पाटील यांनी म्हटले आहे. सर्व घडत असताना यात मोठे षडयंत्र आहे, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. महिलांबाबत बोलताना आदर राहिला पाहिजे, फुले, शाहू, आंबेडकर, सावित्री बाई फुले (Savitri Bai Phule), जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा महाराष्ट्र असून याचा निश्चितच प्रतिवाद करेल असे मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे.

समाजवादी पक्षांना एकत्र करणार :विरोधी पक्ष एक होत आहेत, जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी पुढाकार घेतल्यापासून देशातील विरोधी पक्ष एकवटत आहेत. त्यांनी ते शक्य करून दाखवले, काँग्रेसपासून दुरावलेले पक्ष एकत्र होत आहेत. त्याचबरोबर जनता दलाचे पुनर्जीवन करत आहोत. समाजवादी विचारांचे पक्ष एकत्र करण्याचा (Will unite the socialist parties) प्रयत्न यानिमित्ताने सुरू असून त्यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केले जात आहेत. औरंगाबाद येथे त्याच निमित्ताने दौरा सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून नवीन शक्ती उभारण्याचा प्रयत्न करण्यात येतो, अशी माहिती आमदार कपिल पाटील यांनी दिली.

खाजगीकरण थांबवा :मागील दोन अधिवेशनात खाजगीकरण, कंत्राटीकरण या विरोधात आपण आपले मत व्यक्त केले आहे. राज्यात शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांची भरती थांबवण्यात आली आहे. साडेतीन लाख मुले स्पर्धा परीक्षांची तयार करीत असून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र सरकार भरती करीत नाही. अनेक पद रिक्त आहे, तरीही कंत्राटीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कंत्राटी पद्धतीने भरती केल्यास वेतन कपात होते, शोषण होते, त्यांच्यावर कुठलेही नियंत्रण राहत नाही. कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला ते बांधील नसतात. त्यामुळे कंत्राटी पद्धतीचा विरोध आपण अनेक वेळा केला आहे.

गोरगरीब शिक्षणापासून दूर :नऊ कंपन्यांचा कंत्राट रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र जी सुरू आहे ते देखील तातडीने बंद करावी, पाच लाख कंत्राटी कर्मचारी शासन दरबारी काम करतात. त्यांना तातडीने नियमित सेवेत घेऊन सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षण प्रणालीमुळे गोरगरीब शिक्षणापासून दूर होतील. त्यामुळे त्यांच्या नवीन पॉलिसीचे कौतुक करता येणार नाही, असे देखील आ. कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting : काका-पुतण्यांची गुप्त बैठक; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले...
  2. Rahul Gandhi : 'ते' या देशाचे मूळ मालक आहेत - राहुल गांधी
  3. Independence Day : १८०० विशेष पाहुणे, १२ सेल्फी पॉइंट्स; जाणून घ्या यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात काय आहे खास

ABOUT THE AUTHOR

...view details