औरंगाबाद - टुलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मूळूक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दहा दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील दाहा दिवसांमध्ये दिल्लीमध्ये जाऊन शंतनू यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
शंतनू मूळूक यांना अटकपूर्व ट्रांजीट जामीन मंजूर - टुलकिट प्रकरण लेटेस्ट न्यूज
टुलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मूळूक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दहा दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील दाहा दिवसांमध्ये दिल्लीमध्ये जाऊन शंतनू यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
टुलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा
टुलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात कलम 120 ब आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना बीड येथील शंतनू मुळूक यांचे नाव समोर आले. शंतनू यांचे नाव या प्रकरणात आल्याने, दिल्ली पोलिसांनी बीडमध्ये जाऊन शंतनू यांच्या घराची झडती घेतली होती. अटकेची शक्यता असल्याने शंतनू यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन, अटकपूर्व (एन्ट्रीसिपेट्री) ट्रान्झिट बेलसाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शंतनू यांना दहा दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती शंतनू यांचे वकील सतेज जाधव यांनी दिली आहे.