औरंगाबाद -शहरातील क्रांती चौकातील लोया चेंबर्स येथे गेल्या अनेकस्पा सेंटरच्या नावाने कुंटणखाना चालवला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हेशाखेने शनिवारी छापा टाकत कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी परराज्यातील चार तरूणींना, स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना आणि एका ग्राहकाला ताब्यात घेतले आहे. तसेच 94 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्पा सेंटरच्या नावाने कुंटणखाना; औरंगाबादमधील प्रकार - क्रांती चौक औरंगाबाद स्पा सेंटर
औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील लोया चेंबर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालवला जातो, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पोमनाळकर यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी माहितीची शहानिशा करून शनिवारी संध्याकाळी किरोया स्पा सेंटरवर छापा टाकला.
शहरातील क्रांती चौकातील लोया चेंबर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालवला जातो, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पोमनाळकर यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी माहितीची शहानिशा करून शनिवारी संध्याकाळी किरोया स्पा सेंटरवर छापा टाकला. यात राय सोलमन, झावलनेह ऑरनोराम चोरख्य हे महिला शारीरिक सुखासाठी पुरवत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या सोबत चार महिलांनाही ताब्यात घेतले. तर एका ग्राहक कुशल राजकुमार जैन यालाही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.