औरंगाबादेत आजपासून 'सेरो सर्वेक्षणा'ला सुरूवात - Aurangabad latest news
दिल्लीच्या धर्तीवर औरंगाबादेत आजपासून (सोमवार) 'सेरो सर्वेक्षण' म्हणजेच अँटी बॉडी टेस्ट सुरू करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने झाला, याची माहिती घेण्यात येणार आहे.
![औरंगाबादेत आजपासून 'सेरो सर्वेक्षणा'ला सुरूवात Sero survey begins in Aurangabad from today](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8362644-552-8362644-1597042346208.jpg)
औरंगाबादेत आजपासून 'सेरो सर्वेक्षणा'ला सुरूवात
औरंगाबाद -दिल्लीच्या धर्तीवर औरंगाबादेत आजपासून (सोमवार) 'सेरो सर्वेक्षण' म्हणजेच अँटी बॉडी टेस्ट सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने झाला, याची माहिती घेण्यात येणार आहे. महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने आजपासून शहरातील ११५ वॉर्डांमध्ये अँटी बॉडी टेस्ट करण्यात येणार आहेत. शहरात १० ते १५ ऑगस्ट या कालावधीत अँटी बॉडी टेस्टचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची सुरूवात आज झाली.
औरंगाबादेत आजपासून 'सेरो सर्वेक्षणा'ला सुरूवात
Last Updated : Aug 10, 2020, 1:37 PM IST