औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण येथे तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळी कुंभारवाडा भागातील 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेला औरंगाबाद एमजीएम रुग्णालयात उपचार घेताना तपासले असता रिपोर्ट पॉझिटिव आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आठ दिवस अगोदर आढळलेल्या 65 वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.
पैठणच्या कुंभारवाड्यातील एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण - पैठण कोरोना रुग्णसंख्या बातमी
काल गुरुवारी कुंभारवाडा भागात औरंगाबाद एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या 60 वर्षीय महिलेला कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय विभागाकडून या वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची तपासणी आज करण्यात आली असून त्याचा अहवाल अजून प्रतिक्षेत आहे.
आठ दिवसांआधी शहरात सलग दोन दिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाने मागच्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू केले होते. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तुटल्याचे जाणवले. तर, तीन दिवस एकही कोरोना पॉझिटिव्ह न आढळल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, काल गुरुवारी कुंभारवाडा भागात औरंगाबाद एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय विभागाकडून या वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची तपासणी आज करण्यात आली असून त्याचा अहवाल अजून प्रतिक्षेत आहे.
प्राप्त माहितीनुसार आत्तापर्यंत पैठण शहरात 25, पैठण ग्रामीण भागाच्या पाचोड येथे 3, ईसारवाडी 2 तसेच चितेगाव 1 अशी रुग्णसंख्या असून पैठण तालुक्यात एकूण 32 रुग्ण आढळले आहेत. तर, त्यातले पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.