महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा, अनेक व्यवसायिक कटात शामिल - सनराइज् एन्टरप्राइझेस

प्रत्यक्षात भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारापेक्षा अधिक बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) द्वारे सरकारला 200 कोटीहून अधिकचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यामुळे दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली होती.

भंगार
भंगार

By

Published : Feb 10, 2022, 12:05 PM IST

औरंगाबाद - भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता 200 कोटीचा गंडा घालणाऱ्या व्यापार्‍याला दिल्लीत अटक करण्यात आली. त्याची पाळंमुळं औरंगाबाद मध्ये देखील असल्याचे उघड झाले असुन वाळूज परिसरातील एका व्यावसायिकावर धाक टाकण्यात आली आहे.

असे आहे प्रकरण

प्रत्यक्षात भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारापेक्षा अधिक बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) द्वारे सरकारला 200 कोटीहून अधिकचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यामुळे दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली होती. आणि त्यानंतर त्याची पाळंमुळं शोधण्याचे काम हे सुरू झालं. त्यात राज्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने घोटाळ्यात सहभागी व्यापारी व्यावसायिकांचा शोध सुरू करण्यात आला असून त्याची पाळंमुळं औरंगाबादच्या वाळूज परिसरात आढळून आली आहेत.

नरेगाव येथे सुरू केले होते कार्यालय

दिल्लीतील समीर मालिकेने शहरातील नायगाव येथे सनराइज् एन्टरप्राइझेस या नावाने आपला व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी बोगस नोंदणी केली होती. त्यांनी साठ कोटीचे बिल काढत 10 कोटींची आयटीसी शहरातील 15 ते 16 भंगार विक्रेत्यांचा फॉरवर्ड केली होती. या व्यवहाराचा संशय येथील केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना आल्यानंतर त्यांनी समीर मलिक याला औरंगाबाद मध्ये बोल वले विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आता ज्या भंगार विक्रेत्यांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फायदा घेत फसवणूक केली. अशा फसवणूक करणाऱ्या शहरातील विविध भागातील सतरा पेक्षा अधिक भंगार विक्रेते या कटात सहभागी असल्याचा आढळले आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. पहिली धाड वाळूज येथील हनुमान भंगार दुकानवर टाकण्यात आली आहे. विभागाचे आयुक्त मनोज कुमार रजक, अतिरिक्त आयुक्य ऐस बी देशमुख, उपायुक्त चंद्रकांत केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रवीण कुमार हे पुढील तपास करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details