औरंगाबाद - राज्यातील पूर्ण या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला यामुळे सर्व शाळा बंद झाल्या. आता मात्र कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सोमवारी जाहीर केला आहे. ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव घेऊन व पालकांच्या संमतीने हे वर्ग सुरु करावेत, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या ९०१ गावांमधील १३६८ पैकी ९१९ शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावे -
औरंगाबाद तालुका ७, गंगापूर ७, कन्नड १७३, खुलताबाद ४३, पैठण १४४, फुलंब्री ७३, सिल्लोड १२१, सोयगाव ७९, वैजापूर १२७.
औरंगाबाद जिल्ह्यात शाळांचा वाजणार घंटा शाळांसाठी मार्गदर्शक सूचना - - वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डेस्क, टेबल, खुर्च्या, वाहने यांची वारंवार स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असेल.
- संबंधित शाळेतील शिक्षकांनी गावातच राहावे किंवा येण्या-जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाचा वापर करावा.
- रोज २ सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळेचे आणि त्यातील वर्गांचे स्वतंत्र आगमन आणि गमन यांचे वेळापत्रक व मार्ग शाळांनी निश्चित करावेत, म्हणजे गर्दी टळेल.
ही काळजी घ्यावी -
-एका बाकावर एक विद्यार्थी; २ बाकांमध्ये ६ फुटांचे अंतर
- एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी
- सत्रांच्या वेळा व महत्त्वाच्या विषयांचे आलटून पालटून नियोजन.
- सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचान्यांना आरटीपीसीआर / रॅपिड
- ऑटिजन चाचणी अनिवार्य
- विद्यार्थ्यांची उपस्थिती ऐच्छिक असून ती पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल
राज्यातील कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. परंतु पुन्हा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळा बंद करण्यात आल्या. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांचे ना शैक्षणिक नुसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले. परंतु शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुपमधून बाहेर काढणे. यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. याबरोबरच शाळा बंद व मुले घरी राहण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत.
सामाजिक कौशल्याचे नुकसान, मोबाइलचे आणि इंटरनेटचा गैरवापर, मानसिक तणाव, बालमजुरीचे वाढते प्रमाण, काही मुलांनी केलेल्या आत्महत्या, बालविवाह, शाळाबाह्य मुलांचे वाढते प्रमाण लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना मागितल्या आहेत. जिल्ह्यातील किती गावांमध्ये कोरोना नाही असे त्यात विचारले असता जि. प. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १३६९ गावांपैकी सध्या ९१९ गावांमध्ये कोरोना नाही.