महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 12, 2021, 1:24 PM IST

ETV Bharat / state

औरंगाबादच्या ग्रामीण भागात पाचवी ते सातवी वर्गांचा होणार श्री गणेशा

श्रीगणेशाच्या आगमनासह पाचवी ते सातवी वर्ग सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा बंद होत्या. ऑनलाइन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवले जात होते. मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित होते. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाचवी ते सातवी वर्गांचा होणार श्री गणेशा
पाचवी ते सातवी वर्गांचा होणार श्री गणेशा

गंगापूर (औरंगाबाद) -जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या पत्रात ग्रामीण भागातील शाळेतील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील शाळेचे ५ वी ते ७ वीचे वर्ग उघडण्यास परवानगी देण्यात आली असून मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे शाळा प्रशासनास बंधनकारक राहणार आहे.

औरंगाबादच्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी वर्गांचा होणार श्री गणेशा

श्रीगणेशाच्या आगमनासह पाचवी ते सातवी वर्ग सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा बंद होत्या. ऑनलाइन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवले जात होते. मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित होते. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने पाचवी ते सातवी वर्ग सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. श्री गणेशाच्या आगमनासह शाळेला सुरुवात होणार आहे. मात्र ज्या गावात कोरोनाचे रुग्ण असेल तेथे शाळा सुरू करता येणार नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शासन परिपत्रकानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरू करण्याच्या काही अटी, शर्ती मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.

- या आहेत अटी-शर्ती -

शासन परिपत्रकामध्ये नमूद सर्व सूचनांचे पालन करावे

ज्या शिक्षकांचे लसीकरणाचे पहिला व दुसरा डोस बाकी आहे त्यांनी प्राधान्याने लसीकरण प्रक्रिया पूर्ण करावी.

दोन्ही डोसचे लसीकरण न झालेल्या शिक्षकांनी rt-pcr टेस्ट करण्यात यावी- व त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाप्रमाणे ज्या गावात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत अशा गावात शाळा बंद ठेवावी.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा व कोरोना संबंधित कोणतेही लक्षन दिसणारा विद्यार्थी निदर्शनास येतात ताबडतोब शाळा बंद करण्याबाबत राज्य शासनाच्या संदर्भीय क्रमांक दोन चे परिपत्रक दिनांक 10 ऑगस्ट 2019 मधील आदर्श कार्यप्रणाली(sop) चा अवलंब करावा.

शासनाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सर्व निर्णयाच्या निर्देशाचे पालन करावे यासाठी अटी-शर्तीवर शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा स्वछ करण्याची तयारी सुरू -

पाचवी ते सातवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या सुचना मिळाल्या असुन शाळेचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळेकडून शाळेची साफसफाई करण्यात येत असुन शाळा सॅनीटाईज करण्यात येत आहे. मुलांच्या आरोग्यविषयी संपूर्ण काळजी घेण्यात येणार असुन शाळेच्या बाहेरच विद्यार्थ्यांचे तापमान,ऑक्सीमीटर लाऊन ऑक्सिजन लेवल चेक करून हात सॅनिटाईज करून मास्क कंपल्सरी असणार असल्याचे मुख्यध्यापकांनी सांगितले आहे.

कोरोना रुग्ण असलेल्या गावातील शाळा बंदच-

ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली असुन शाळेत बसुन प्रत्यक्ष शिक्षण घेता येणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी ज्या गावामध्ये कोरोनाचा सक्रिय रुग्ण असेल किंवा शाळा सुरू झाल्यावरही कोरोनाचा सक्रिय रुग्ण आढळल्यास ,किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना कोरूना संबंधीचे कोणतेही लक्षण निदर्शनास येताच शाळा बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील पाचवी ते सातवी वर्ग असलेल्या खाजगी, जिल्हा परिषद, उर्दू सर्व व्यवस्थापनाच्या २६६ शाळा आहे. त्यात शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोनाचा सक्रिय रुग्ण असलेल्या गावात शाळा बंद असणार आहे. दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा गजबजनार आहे.कोरोनाचे प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पाळून पाचवी ते सातवीचे वर्ग भरवणार असल्याचे शाळेच्या मुख्यध्यापकांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details