औरंगाबाद- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसाचा अवधी उरला आहे. राज्यातील लोकांनी मत देऊन निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवावा या हेतूने पैठण तालुक्यातील चौंढाळा येथील जगदंबा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी निर्माण केली आहे. या साखळीद्वारे विद्यार्थ्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मानवी साखळीद्वारे चिमुकल्यांनी केली मतदान जनजागृती - Paithan Human Chain News
निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. मतदान हे आपले मुख्य कर्तव्य. मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा यासाठी जगदंबा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे 'व्होट प्लीज' असे इंग्रजी वाक्य तयार करून मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. यामध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जनजागृती केली आहे.
निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे व मतदान हे आपले मुख्य कर्तव्य. मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा यासाठी जगदंबा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे 'व्होट प्लीज' असे इंग्रजी वाक्य तयार करून मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. यामध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जनजागृती केली आहे. त्याचबरोबर मुलांनी आपआपल्या पालकांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचे सांगितले आहे. या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शाळेचे सचिव प्रशांत नरके, मुख्यध्यापिका प्रियंका थोटे, पर्यवेक्षिका मयुरी खोबरे, संतोष रखे, पांडुरंग बांगर, कल्याणी कुलकर्णी, संतोष बांगर, मोनिका बोडके, मरयम शेख, अविनाश बांगर, प्रगती पहाडे, संदीप बर्वे, वैष्णवी देशमाने, अश्विनी नाचण यांनी मानवी साखळी निर्मितीसाठी मेहनत घेतली आहे.
हेही वाचा-मतदान जागृतीसाठी धावले औरंगाबादकर; जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम