औरंगाबाद- औरंगाबाद - यूपीएचे पुनर्गठन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन त्या आघाडीचे नेतृत्व करायला हवे, कारण देशातील अनेक प्रादेशिक पक्ष सध्या काँग्रेसच्या नेतृत्वात काम करायला तयार नाहीत, असे परखड मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. या नवीन आघाडीचे भविष्य काँग्रेसच्या त्याग आणि उदारतेवर अवंलबून असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
राऊत पुढे म्हणाले, सध्या देशात एनडीएचे अस्तित्व दिसत नाही, अनेक पक्ष बाहेर पडले आहेत. त्याच प्रमाणे युपीएचीदेखील परिस्थिती झाली आहे. त्यासाठी युपीएचे पुनर्गठण व्हायला हवे, आणि त्याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी करायला हवे, तर अनेक भविष्यात अनेक पक्ष एकत्रित येतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र हे काँग्रेसच्या सहमती शिवाय शक्य नाही.
यूपीएचे पुनर्घटन केलं पाहिजे
महाराष्ट्रातून यूपीएला एक नव रूप मिळू शकते. शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसला मनाचा मोठेपणा आणि त्याग करावा लागेल. त्यावेळी अनेक पाऊले उचलली जाऊ शकतात. देशपातळीवर प्रादेशिक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर या प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी औरंगाबादेत व्यक्त केली.
संजय राठोड यांचा राजीनामा नैतिकतेला धरून