महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राठोड यांचे औरंगाबादेत जंगी स्वागत, समाजाने दिले अर्धाकिलो चांदीचे कडे

माजी मंत्री संजय राठोड औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी सातारा बंजारा मंडळ तर्फे सातारा तांडा येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. बऱ्याच महिन्यांनी त्यांनी मतदार संघाबाहेर दौरा केला. महिलांनी बंजारा नृत्य करत, गाणी गात पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केलं.

समाजाने दिले अर्धाकिलो चांदीचे कडे
समाजाने दिले अर्धाकिलो चांदीचे कडे

By

Published : Jul 13, 2021, 8:07 AM IST

औरंगाबाद - माजी मंत्री संजय राठोड समाजाची साथ मिळवण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. खोट्या प्रकरणात अडकवले जात असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून होत असलेल्या भेटीगाठी होत असल्याने समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न राठोड करत असल्याची चर्चा होत आहे. मंत्री मंडळात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी राठोड शक्तिप्रदर्शन करत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. संजय राठोड सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते.

औरंगाबादेत जंगी स्वागत

औरंगाबादेत राठोड यांचं जंगी स्वागत

माजी मंत्री संजय राठोड औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी सातारा बंजारा मंडळ तर्फे सातारा तांडा येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. बऱ्याच महिन्यांनी त्यांनी मतदार संघाबाहेर दौरा केला. महिलांनी बंजारा नृत्य करत, गाणी गात पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केलं.

समाजाने दिले अर्धा किलोचे चांदीचे कडे

संजय राठोड यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दुपारच्या सुमारास सातारा तांडा येथे पहिला सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर संजय राठोड यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बंजारा समाजातर्फे राठोड यांना अर्धा किलो चांदीचे कडे भेट देण्यात आले. त्यामुळे संजय राठोड आता राज्यात पुन्हा सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

तुम्ही माझ्यासोबत रहा

संजय राठोड यांनी कार्यक्रमात नागरिकांशी बंजारा भाषेत संवाद साधला. माझी भाजपसह काही लोक बदनामी करत आहेत. कोणत्याही पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात गुन्हा दाखल नाही. तुम्ही माझ्यासोबत रहा असे आवाहन संजय राठोड यांनी जाहीर कार्यक्रमात केले. यावेळी तांड्यावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली.

हेही वाचा -पंकजा मुंडे मंगळवारी घेणार नाराज समर्थकांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details