महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोहयोच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील 136 रस्त्यांना मंजुरी - औरंगाबाद जिल्हा लेटेस्ट न्यूज

पैठण तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतवस्ती वरील रस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते, अंतर्गत जोड रस्त्यांच्या समस्या होत्या. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेकांच्या जमिनी पडीक पडल्या होत्या. शेतात जायला रस्ताच नसल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता तालुक्यात रोहयो अंतर्गत कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

रोहयोच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील 136 रस्त्यांना मंजुरी
रोहयोच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील 136 रस्त्यांना मंजुरी

By

Published : Jun 13, 2021, 10:40 PM IST

औरंगाबाद - पैठण तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतवस्ती वरील रस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते, अंतर्गत जोड रस्त्यांच्या समस्या होत्या. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेकांच्या जमिनी पडीक पडल्या होत्या. शेतात जायला रस्ताच नसल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता तालुक्यात रोहयो अंतर्गत कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

रोहयोच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील 136 रस्त्यांना मंजुरी

136 रस्त्यांना मंजुरी

पावसाळ्यात शेतात खते, बी-बियाणे यांची वाहतूक करताना रस्ता नसल्याने अडचण निर्माण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी रोजगार हमी योजोनेच्या माध्यमातून रस्ते तायार करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रोहत्साहन दिले. याचा परिणाम म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीमार्फत तालुक्यातील 136 रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून, अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक रस्त्यांची कामे मजुरांच्या मागणीनुसार सुरू करण्यात येणार असून, ज्यामध्ये शेत रस्ते, बारमाही जोड रस्ते, पाणंद रस्ते, वैयक्तिक सिंचन, विहिरी, घरकुल, मोहगनी वृक्ष लागवड अशा कामांचा समावेश आहे.

हेही वाचा -ठरलं..! ओबीसींच्या न्यायहक्कांसाठी शिबीर भरणार, तारीख आणि ठिकाणही ठरले

ABOUT THE AUTHOR

...view details