महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धीवर अपघातात कारणीभूत असणाऱ्या 2 आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

Samruddhi Mahamarg Accident : रविवारी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांनी या अपघात प्रकरणी संबंधित दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 9:36 AM IST

Updated : Oct 16, 2023, 9:46 AM IST

मनीष कलवानिया, पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघात प्रकरणी ट्रक चालक आणि आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलीय. शनिवारच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर गाडी ट्रकवर आदळल्यानं अपघात झाला होता. यात 12 जणांचा मृत्यू तर, 23 जण जखमी झाले होते. आरटीओनं समृद्धी महामार्गावर ट्रक अडवल्यानं ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.


आरटीओच्या कारवाईमुळं अपघात : शनिवारची रात्र नाशिक जिल्ह्यातील बारा जणांसाठी काळरात्र ठरली. भरधाव टेम्पो ट्रकवर धडकल्यानं बारा जणांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरून शनिवारी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नाशिकच्या दिशेनं जात होता. त्यावेळी आरटीओच्या एका गाडीनं त्यांचा पाठलाग करत गाडी थांबवण्यास सांगितलं, ताशी पन्नास किलोमीटर वेगानं हा ट्रक जात होता. मधल्या लेन मधून ट्रक चालकानं गाडी शेवटच्या लेनमध्ये आणली. आरटीओ अधिकारी कागदांची पडताळणी करत असताना तशी शंभरहून अधिक वेग असलेली टेम्पो ट्रॅव्हलर गाडी ट्रकवर येऊन धडकली. क्षणात काय झालं हे कोणालाही कळालं नाही. या दुर्घटनेत सैलानी बाबाच्या दर्शनाहून घरी परत येणाऱ्या बारा जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी ट्रकचालक ब्रिजेश कुमार चंदेल व क्लीनर संतराम शिंदे यांना पोलिसांनी घटना घडल्यावर लगेच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अपघाताची कारणं लक्षात घेता मोटर वाहन निरीक्षक प्रदीप राठोड आणि नितीन गोणारकर यांच्यावर वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलीय.


आरटीओच्या कारवाईबाबत प्रश्न : समृद्धी मार्ग तयार करताना काही नियम तयार करण्यात आले होते. मुख्य म्हणजे वाहनांची तपासणी या मार्गावर करू नये, असा नियम तयार करण्यात आला होता. पोलीस असो किंवा आरटीओ यांनी टोल नाक्यावर वाहन प्रवेश करत असताना तिथंच त्यांची तपासणी करणं अपेक्षित आहे. मात्र कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीची तपासणी होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तर या महामार्गावर जाणाऱ्या वाहनांकडून चिरीमिरी घेण्यासाठी आरटीओ कारवाई करते, असे आरोप अपघातस्थळी उपस्थित झालेल्या स्थानिक नागरिकांनी केला. त्यामुळं आरटीओची ही कारवाई कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तातडीनं हे प्रकार थांबवावे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

समृध्दी ठरतोय मृत्यूचा महामार्ग : नागपूर-मुंबई हा लांब पल्ल्याचा प्रवास वेगवान करण्यासाठी सरकारनं समृद्धी महामार्ग तयार केला. अतिशय उत्कृष्ट कामाचा नमुना म्हणून या महामार्गाकडं पाहिलं जातं. वेगानं आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचणं अगदी सोपं झालं. परंतु, हा महामार्ग आता मृत्यू मार्ग होतोय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. कारण मागील दहा महिन्यांमध्ये समृद्धी महामार्गावर झालेल्या 1281 अपघातांत 123 जणांना आपले जीव गमवावे लागले. तर 417 जण गंभीर जखमी झाले आहेत. अतिशय वेगवान असलेल्या या महामार्गावर वाहन चालवताना काही नियम पाळणं अपेक्षित आहे. मात्र, त्यात कसूर होत असल्यानं, अपघातांची मालिका पाहायला मिळते. अनेक वेळा कारण समोर आली असताना, सरकार उपाययोजना करण्यात कमी पडतंय का? असा प्रश्न या निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांना पडतोय.



हेही वाचा :

  1. Samruddhi Mahamarg Accident : महामार्गावरील आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करा; अपघातानंतर दानवेंची मागणी, पहा व्हिडिओ
  2. Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर १२ जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर
  3. Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी' नव्हे 'मृत्यूचा' महामार्ग? आजपर्यंत अपघातांत किती जणांचा मृत्यू? काय आहेत अपघातांची कारणं, वाचा सविस्तर
Last Updated : Oct 16, 2023, 9:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details