महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sambhajinagar firing : औरंगाबादमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर

औरंगाबादमध्ये गोळीबार झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 9, 2023, 10:54 PM IST

Updated : Aug 9, 2023, 11:06 PM IST

संभाजीनगर (औरंगाबाद) - पैशाच्या वादातून बायजीपुरा भागात भर रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण जागेवर ठार झाला आहे तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबारातील आरोपी पसार झाले आहेत.

हा गोळीबार भर रस्त्यावर झाल्याने सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली होती. एकूण चार राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मागच्या आठवड्यात देखील घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. आजचा गोळीबार हा पैशाच्या वादातून झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी खरे तर एकाला मारण्याचा उद्देश होता. मात्र दुसरा जवळ असल्यामुळे त्यालाही गोळ्या लागल्या. त्यामध्ये तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या गोळीबारातील आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी लगेच नाकाबंदीही करण्यात आली आहे. पोलिसांचे विशेष पथकही या कामी सक्रिय झाले आहे. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अलिकडच्या काळात गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. किरकोळ कारणावरुन अनेकदा असे प्रसंग घडत असल्याने पोलिसांच्या पुढील डोकेदुखी वाढली आहे. तसेच लोकांची मानसिकताही हिंसक बनत चालल्याचे दिसून येत आहे. नुकतेच मुंबई सुपर फास्ट एक्सप्रेसमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या चेतन सिंहची पोलीस कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. या रिमांडमध्ये त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये आणखी चार कलमांची वाढ करण्यात आली. आता चेतन सिंहवर कलम 153 (अ), 363, 341 आणि 342 लावण्यात आले आहेत. चेतन सिंहला कडक सुरक्षा व्यवस्थेत बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले. हे प्रकरण धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने आरोपीला चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. चेतन सिंहला न्यायालयात आणत असताना पोलिसांच्या कारला एकूण 3 रॉयट कंट्रोल गाड्या एस्कॉर्ट करत होत्या. तीनही वाहनांमध्ये सुमारे 45 जवान होते. आरोपीचे मोठे भाऊ आणि पत्नी मुंबईत आले आहेत. सध्या ते आरपीएफच्या देखरेखीखाली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 125 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Last Updated : Aug 9, 2023, 11:06 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details