औरंगाबाद- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहे. मात्र, उस्मानपूरा येथील एक केशकर्तनालय सुरू असल्याने सलून चालकावर पोलीस कारवाई करण्यात होती. दरम्यान, फेरोज खान कदीर खान पोलीस ठाण्यात नेत असतांना तो खाली पडून जखमी झाला. यावेळी त्याचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे फेरोज खान कदीर खान (वय 50 वर्षे) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
संतप्त नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या मांडला असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली असून घटनेची माहित मिळताच अनेक नागरिकांनीही पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.