महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Crime : औरंगाबाद शहरात 'सैराट'ची पुनरावृत्ती; भररस्त्यात 'दाजी'चा कुऱ्हाडीने निर्घृण खून - Aurangabad Murder Case

औरंगाबाद शहरात भरदिवसा ( Sairat Repeats in Aurangabad City ) औरंगाबाद-पुणे महामार्गावर ( Brutal Murder of Sisters Husband with Axe on Street ) स्वतःच्या भावजीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस तपासात समोर ( Aurangabad Crime ) आले की, बहिणील पळवून ( Aurangabad Murder Case ) नेल्याच्या रागातून भावजीला भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला आहे. शहरात सैराटची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Aurangabad Crime
औरंगाबाद शहरात 'सैराट'ची पुनरावृत्ती; भररस्त्यात 'दाजी'चा कुऱ्हाडीने निर्घृण खून

By

Published : Dec 29, 2022, 10:44 PM IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात 'सैराट' चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली ( Sairat Repeats in Aurangabad City ) आहे. बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या ( Aurangabad Crime ) भाऊजीला औरंगाबाद-पुणे महामार्गावर दहेगाव बंगलाजवळ इसारवाडी ( Brutal Murder of Sisters Husband with Axe on Street ) फाटा येथे भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार ( Aurangabad Murder Case)करून निर्घृण खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर खून केल्यानंतर रस्त्यावर जल्लोष करून मोटर सायकलवरून पसार झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.

बहिणीला पळवून नेल्याचा रागातून आपल्याच भाऊजीची हत्याबापू खिल्लारे असे मृत झालेल्या तीस वर्षीय युवकाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वाळुंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी गेलेल्या दिशेने पोलीस पथके रवाना केली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, घटनास्थळी साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट दिली. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने बहिणीला पळवून नेल्याचा रागातून आपल्याच भाऊजीची हत्या केल्याचे कारण समोर आले आहे. औरंगाबाद शहरात दिवसभरात ही दुसरी खुनाची घटना उघडकीस आल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सैराट खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, आरोपीची विचारपूस वाळुंज पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details