महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामविकास अधिकाऱ्याला 4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Rural Development Officer arrested while taking a bribe

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला 4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

aurngabad
ग्रामविकास अधिकाऱ्याला 4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

By

Published : Feb 2, 2020, 12:36 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामविकास अधिकारी सुधाकर नारायणराव घुले याला 4 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. औरंगाबाद टीव्ही सेंटर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -पाचोड येथे राज्यातील चौथ्या रेशीम उद्योग खरेदी-विक्री केंद्र, राज्यातील पहिले मोसंबी व्हॅक्सिंग पॅकेंजिंग केंद्राचे उद्घाटन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद टीव्ही सेंटर परिसरात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड आणि विहीर खोदकामाचा ग्रामसभेचा ठराव देण्याकरिता प्रत्येकी 4 जणांकडून एक एक हजाराची लाच ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले याने मागितली. परंतु, तक्रारदाराने त्याची लाचलुचपत विभागाला माहिती दिली.

हेही वाचा -विविध मागण्यांसाठी मराठवाड्यातील तीन हजार शिक्षकांचा बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार

त्यावरून शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपधीक्षक मारोती पंडित यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलीस नाईक विजय ब्राम्हंदे, सुनील पाटील विलास चव्हाण केदार कंदे, कपिल गाढ़ेकर, चागदेव बागुल या लाचलुचपत विभागाचा कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सुधाकर नारायणराव घुले याला रंगेहाथ पकडले. पुढील कारवाईसाठी घुले याला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details