औरंगाबाद- कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी कन्नड तालुक्यातील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीनशे लिटर सॅनिटायझरचे वाटप केले आहे. रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून घरून राज्यातील विविध आरोग्य केंद्रे, पोलीस आयुक्तालये यांच्याशी संपर्क ठेवत तब्बल २० हजार लिटर सॅनिटायझरचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे.
रोहित पवारांची सामाजिक बांधिलकी, कन्नडमध्ये 300 लिटर सॅनिटायझरचे वाटप - कर्जतचे आमदार रोहित पवार
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शहरांमध्ये सॅनिटायझरचे वितरण केले जात आहे. यात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूर, औरंगाबादसह १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.कन्नडमधील ग्रामीण रुग्णालय, नगर पालिका, पोलीस विभाग तसेच अत्यावशक सेवा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या शासकीय अधिकारी यांना तिनशे लिटर सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले आहे.
कन्नडला 300 लिटर सॅनिटायझरचे वाटप
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शहरांमध्ये सॅनिटायझरचे वितरण केले जात आहे. यात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूर, औरंगाबादसह १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. कन्नडमधील ग्रामीण रुग्णालय, नगर पालिका, पोलीस विभाग तसेच अत्यावशक सेवा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या शासकीय अधिकारी यांना तिनशे लिटर सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले आहे.