औरंगाबाद - राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे याच्या भावाची दादागिरी समोर आली आहे. ( Rohio Minister Sandipan Bhumare Brother ) भुमरे यांच्या भावाने भाजप ( BJP office bearer beaten ) पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह का केले म्हणत राजू भुमरे यांनी भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला दांड्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
फेसबुक लाईव्ह केल्याने झाला वाद
भुमरे यांच्या मतदारसंघातील धुळे-सोलापूर महामार्गापासून असणाऱ्या रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात बोगस रस्त्याबाबत भाजप तालुका उपाध्यक्ष रणजीत नरवडे आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे हे फेसबुक लाईव्ह करत असल्याच कळताच राजू भुमरे आपल्यासोबत काही लोकांना हातात लाठ्या-काठ्या घटना स्थळी दाखल झाले. फेसबुक लाईव्ह संपताच भुमरे यांनी नरवडे यांना शिवीगाळ करत हातातील दांड्याने बेदम मारहाण केली. याबाबत तक्रार देऊनही पाचोड पोलीस गुन्हा नोंदवून घेत नसल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे यांनी केला आहे.